महाराष्ट्र शासन
अल्पसंख्यांक विकास विभाग द्वारा
" पोलीस भरतीपूर्व निवासी मोफत प्रशिक्षण "

गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट, ओरोस बुद्रुक संचलित

Gurukul Career Academy Oros, Sindhudurg

“स्पर्धा परीक्षेतील यशाकडे वाटचाल  – तुमच्या यशाचा गुरुकुल! MPSC, पोलिस भरती, तलाठी,  SSC व इतर परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग.”

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्यांक विकास विभाग द्वारा
" पोलीस भरतीपूर्व निवासी मोफत प्रशिक्षण "

गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट, ओरोस बुद्रुक संचलित

Gurukul Career Academy Oros, Sindhudurg

“स्पर्धा परीक्षेतील यशाकडे वाटचाल  – तुमच्या यशाचा गुरुकुल! MPSC, पोलिस भरती, तलाठी,  SSC व इतर परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग.”

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्यांक विकास विभाग द्वारा
पोलीस भरतीपूर्व निवासी मोफत प्रशिक्षण

बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

दिनांक : ३० जून २०२५

संदर्भ : शा. नि. क्र. : पोभप्र २०२३/ प्र.क्र.७४/का.९

       अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मान्यतेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्या करिता गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट, ओरोस बुद्रुक संचलित गुरुकुल करियर ॲकॅडेमी, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या संस्थेची अल्पसंख्यांक समुदायातील युवक युवतींना पोलीस भरतीपूर्व निवासी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.

        सदरच्या मोफत निवासी प्रशिक्षणासाठी खालील अटी शर्ती नुसार पात्र असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यां कडून दिनांक १० जुलै २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अटी शर्ती पुढील प्रमाणे – 

१) सदर कार्यक्रमान्वये पोलीस भरतीपूर्व निवासी मोफत प्रशिक्षण बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन या अल्पसंख्यांक प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी असेल.
२) प्रशिक्षण कालावधी तीन महिन्याचा राहील.
३) सदरचे प्रशिक्षण पूर्णतः निवासी स्वरूपाचे आहे. प्रशिक्षार्थ्यांची एकूण मर्यादा संख्या ५० असून त्यापैकी ३०% जागा महिला प्रशिक्षणार्थ्यांसाठी आरक्षित असतील. महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास पुरुष उमेदवाराचा विचार करण्यात येईल.
४) या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी या स्वरूपातील कोणत्याही योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.
५) उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक आवश्यकता निकष

श्रेणीपुरुष महिला
उंची १६५ १५५
छाती ७९ सेमी पेक्षा कमी नसावीNA

निवड प्रक्रिया

पुढील मानकांचा आधारे गुणवत्ता यादी नुसार प्रथम ५० जणांची निवड करण्यात येईल.

  • शारीरिक चाचणी
  • लेखी चाचणी
  • बारावी परीक्षेतील गुण

टिप : सदरची निवड प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्णतः मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शक सुचने नुसार राबवण्यात येईल.

प्रशिक्षण कालावधीतील सुविधा

१) प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारांना गणवेष, बूट, मौजे, बनियान, २ पुस्तके, १ पेन, १ पेन्सिल इत्यादी साहित्य पुरवण्यात येईल.
२) प्रशिक्षण तीन महिन्यांकरित्या असून निवासासाठी हॉस्टेल सुविधा, चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण हे मोफत असेल.
३) तीन महिन्यांमध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार पोलीस भरतीसाठी आवश्यक विषयांची व्याख्याने, मैदानी कोचिंग, ३ लेखी व ३ शारीरिक परीक्षा घेण्यात येईल.
४) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, व मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सह्यांची प्रमाणपत्रे देण्यात येतील.

संचालक तथा प्राचार्य

गुरुकुल करियर ॲकॅडेमी, ओरोस

नाव नोंदणी करा

प्रवेश प्रक्रिया सुरु

सिंधुदुर्गातील अग्रगण्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

गुरुकुल करिअर ॲकॅडमी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि शिस्तबद्ध संस्था आहे. आम्ही विद्यार्थ्यांना पोलीस भरती, MPSC, सेना भरती, तलाठी, व इतर सरकारी भरती परीक्षांसाठी प्रभावी मार्गदर्शन आणि मानसिक तयारी करून घेतो. अनुभवी मार्गदर्शकांचे नियमित मार्गदर्शन, टेस्ट सिरीज, वेळापत्रकानुसार अभ्यास आणि प्रेरणादायी वातावरण हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

गुरुकुल करिअर ॲकॅडमी ओरोस, सिंधुदुर्ग

300
विध्यार्थ्यांना एकाच वेळी प्रशिक्षण देता येईल असा अत्याधुनिक सुविधांनी युक्त प्रशस्त लेक्चर हॉल
200
मुले व मुलींची न्याहारी जेवणासह प्रशस्त निवासी व्यवस्था ( २४ तास रेक्टर नियंत्रण ) सर्वत्र CCTV कॅमेरे. मुलींसाठी सुरक्षित वातावरण
40-45%
सिलेक्शन रेट -
(विविध शासकीय पदांवर नियुक्ती)
48,000
पेक्षा जास्त प्रश्न विश्लेषण सहित सराव

एका दृष्टीक्षेपात (At a Glance)

तणावमुक्त एकाग्रतेसाठी निसर्गरम्य वातावरण

यशस्वी मुले  घडविणे  ……..!!! , याच  ध्यासाने तळमळीने काम करणारी गुरुकुल टीम, एकाच छताखाली सर्व सुविधा आणि प्रशस्त मैदानाची व्यवस्था, १०० विध्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररी व अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक व शिक्षक वृंद

आमची वैशिष्ट्ये

अनुभवी प्राध्यापक, नियमित टेस्ट सिरीज व शिस्तबद्ध अभ्यासाचं वातावरण. व्यायाम व प्रेरणादायी
मार्गदर्शनासह सर्वांगीण तयारी. निवास, जेवण व मैदानी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व अद्ययावत सुविधा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड.

आमची वैशिष्ट्ये

अनुभवी प्राध्यापक, नियमित टेस्ट सिरीज व शिस्तबद्ध अभ्यासाचं वातावरण. व्यायाम व प्रेरणादायी
मार्गदर्शनासह सर्वांगीण तयारी. निवास, जेवण व मैदानी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व अद्ययावत सुविधा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड.

काही निवडक क्षणचित्रे

एकच लक्ष.... एकच ध्यास....

Meet the team

श्रद्धा ढोणुकसे

संचालक

संस्थेच्या आधारस्तंभ व आपल्या अकॅडेमीच्या मुख्य संचालक तसेच मॅनॅजमेण्ट आणि सर्व्हिस मधील तज्ञ् व्यक्तिमत्व.

सुनिल ढोणुकसे

प्राध्यापक

१५ वर्षाहून अधिक स्पर्धा परीक्षा तयारी विषयाचा अनुभव.
मुख्य विषय – गणित बुद्धिमत्ता, राज्यघटना, समुपदेशन.

बी. एस. जांभेकर

प्राध्यापक

१४ वर्ष स्पर्धा परीक्षा तयारी विषयाचा अनुभव.
मुख्य विषय – मराठी, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी

संकेत कदम

प्राध्यापक

१० वर्ष क्रीडा प्रशिक्षण विषयाचा अनुभव.
क्रीडा प्रशिक्षक – राज्य स्तरीय खेळाडू
तसेच टेक्निकल एक्स्पर्ट

HELP

Frequently Asked Questions

गुरुकुल करिअर ॲकॅडमीबद्दल विद्यार्थ्यांना पडणारे सर्व सामान्य प्रश्न आणि त्यांची स्पष्ट, उपयोगी उत्तरे येथे दिली आहेत.

आम्ही पोलीस भरती, तलाठी/लिपिक, MPSC, सेना भरती, SSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण पुरवतो.

होय, पोलीस व सेना भरतीसाठी व्यायाम व मैदानी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहे.

क्लासेस सकाळ व संध्याकाळच्या सत्रात चालतात, आणि प्रत्येक कोर्सनुसार वेळापत्रक ठरवले जाते.

होय, आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास व पौष्टिक जेवणाची सोय उपलब्ध करून देतो.

होय, दररोज टेस्ट सिरीज, साप्ताहिक मॉक टेस्ट व पेपर विश्लेषण दिलं जातं.

कोर्सनुसार फी वेगळी असते. आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन पेमेंटची सुविधा घेतो .

तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेश घेऊ शकता. कागदपत्रे व अर्ज आवश्यक असतात.

होय, प्रत्येक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार प्रिंटेड नोट्स व संदर्भ साहित्य दिलं जातं.

काही कोर्ससाठी ऑनलाईन क्लासेसची सुविधा व यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ उपलब्ध आहेत.

Contact: 7264920062/9011623164
Address: Gurukul Career Academy, Oros, Sindhudurg, Maharashtra
Website: www.gurukulacademy.org.in

नाव नोंदणी करा

प्रवेश प्रक्रिया सुरु

Admission

नाव नोंदणी करा

दिनांक १० जुलै २०२५ पर्यंत

नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

Gender
कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ?
Documents Required
Check
Gender
कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ?
Documents Required
Check
कृपया फॉर्म सबमिट झाल्यावर खाली दिलेल्या व्हाट्सअप बटण वर क्लिक करून स्क्रीनशॉर्ट टाकावा. तसेच आपले पूर्ण नाव लिहून सेंड करावे.
कृपया फॉर्म सबमिट झाल्यावर खाली दिलेल्या व्हाट्सअप बटण वर क्लिक करून स्क्रीनशॉर्ट टाकावा.
तसेच आपले पूर्ण नाव लिहून सेंड करावे.

CONTACT US

मुख्य इमारत

शैक्षणिक उन्नतीसाठी समर्पित, आधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे शांत वातावरण आणि आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Gurukul Career Academy
Oros, Sindhudurg

38 Bunglow, Next to Jalakewadi, At Post Oros, Taluka Kudal, District - Sindhudurg 416812

Phone Numbers

9923833793
9075385256

E-mail

gurukulacademy.oros@gmail.com
gurukul.oros@gmail.com

WhatsApp Image 2025-07-01 at 5.35.19 PM

गुरुकुल करिअर ॲकॅडमी ओरोस, सिंधुदुर्ग

Enquiry

9923833793

Admissions

9075385256

Admission

आत्ताच प्रवेश घ्या - फी मध्ये सवलत मिळवा

नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु